ॲड. प्रदिप अनंतराव मोरे हे तळागाळातील लोकनेते असून त्यांचा जन्म एका मध्यम वर्गिय कुटुंबात झाला. भाजपाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी हिंदुत्व तत्त्वज्ञानाचा अवलंब केला आणि लातूर मध्ये भारतीय जनता पक्षाचे सामान्य कार्यकर्तें म्हणून काम सुरू केले. आता ते लातूर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाजपचे सच्चे कार्यकर्ते, ॲड. प्रदिप मोरे हे सक्षम वृत्तीची प्रेरणा देतात. सामाजिक, राजकीय तसेच आध्यात्मिक कार्याची आवड असल्याने, शासकीय नोकरीचा त्याग करून सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या या सामान्य कार्यकर्त्याला प्रशासनाची उत्तम जाण व स्वच्छ प्रतिमा तसेच काँग्रेसचे कै. विलासराव देशमुख परिवाराचा प्रखर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाते.
1967
जन्म
ॲड. प्रदिप अनंतराव मोरे यांचा जन्म 8 मे 1967 रोजी झाला. त्यांचे शिक्षण M.A आणि LLB पर्यत झाले आहे. त्यांचा सध्याचा व्यवसाय वकीली आणि रियल इस्टेट या क्षेत्रात आहे.
1985
कनिष्ठ अभियंता
जिल्हा परिषद लातूर अंतर्गत लघुपाटबंधारे विभाग येथे कनिष्ठ अभियंता म्हणून इसवी सन 1985 ते 1988 पर्यंत कार्यरत
1991
राजकारणात सक्रिय सहभाग
सन 1991 च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद / पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आदी निवडणुकीत सक्रिय सहभाग व विविध जबाबदारी पार पाडली.
1993
पूर्णवेळ सहभाग
सन 1993 च्या लातूर जिल्ह्यातील महाप्रलयंकारी भूकंपामध्ये पक्षातर्फे मौजे नांदुर्गा तालुका औसा जिल्हा लातूर हे गाव दत्तक घेण्यात आले होते, यामध्ये पूर्णवेळ सहभाग.
1994
कार्याची जबाबदारी सांभाळली
मा. डॉ. गोपाळरावजी पाटील साहेब हे राज्यसभेचे (मार्च 1994 ते मार्च 2000) खासदार असताना त्यांच्या प्रशासकीय कार्याची जबाबदारी सांभाळली.
2000
लातूर तालुका अध्यक्ष
लातूर तालुका अध्यक्ष (सन 2000 ते 2003 ) असताना लातूर तालुक्यातील 117 पैकी 69 गावांमध्ये भाजपाच्या शाखा स्थापन केल्या. तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नियमित बैठक चालू केली. बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकशाही दिनामध्ये कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य. तालुक्यातील शाखांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून विशेष ओळखपत्राचे वाटप केले. शासकीय कार्यालयात या ओळखपत्राचा चांगलाच उपयोग कार्यकर्त्यांना होत असे. नियमित बैठका होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आपापसातील मतभेद दूर होऊन सर्वचजण एक दिलाने पक्ष कार्य करीत असत. याचाच परिणाम म्हणून लातूर तालुक्यात सत्यवान गोकुळे हा कार्यकर्ता सर्वप्रथम पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आला व पक्षाचे लातूर ग्रामीण मध्ये खाते उघडले. विशेष म्हणजे कै. विलासराव देशमुख हे (ऑक्टोबर 1999) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. दरम्यान अनेक ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून आणण्यात पुढाकार.
2013
आध्यात्मिक कार्य
संपूर्ण जगामध्ये आध्यात्मिक कार्य मोठ्या प्रमाणात राबवणारी सर्वात मोठी धार्मिक चळवळ असलेल्या इस्कॉनमध्ये सक्रिय सहभाग. लातूर येथे सदर चळवळ रुजविण्यात सक्रिय पुढाकार जगन्नाथ रथ यात्रा लातूरमध्ये इस्कॉन तर्फे चालू करण्यात सिंहाचा वाटा. सन 2013 पासून दरवर्षी नियमितपणे आता सुद्धा रथयात्रा होत आहे. दर रविवारी प्रवचन व मोफत अन्नदान करण्यात येते. लातूरमध्ये स्थायी स्वरूपाचे केंद्र चालू करण्यात महत्त्वाची भूमिका.
2024
सक्रिय राजकारण
1991 पासून 2024 पर्यंत ॲड. प्रदिप अनंतराव मोरे यांनी कोणत्याही राजकीय अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पक्षासाठी त्यांच्या विचारांना लोकांमध्ये रुजवण्यासाठी कष्ट केले आहे.