इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे सुरक्षित आहे काय ?
सध्या सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी चालू आहे . निवडणुकीसाठी ईव्हीएम चा वापर होतो
पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर 2013 मध्ये नागालँड येथे करण्यात आला. नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने तो देशात सर्वत्र चालू झाला आणि आता देशातल्या प्रत्येक निवडणुका या ईव्हीएम चा वापर करून होतात. ईव्हीएम च्या वापराबाबत अनेक शंका घेतल्या जातात. काहीजणांच्या मते ईव्हीएम हॅक केला जाऊ शकते. तसेच ईव्हीएम मध्ये ॲडजस्टमेंट करून एकाचे मत दुसऱ्याला दिले असं होऊ शकतं . तसेच काही जणांना असं वाटतं की ईव्हीएम मध्ये फेरफार करून मतमोजणीच्या वेळेस त्यामध्ये गडबड करता येऊ शकते. अनेक प्रकारच्या शंका या ईव्हीएम बाबत घेतल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने या सर्व शंका फेटाळून ईव्हीएम हे अतिशय खात्रीशीर असून त्यामध्ये काहीही बदल करणे शक्य नाही असे वेळोवेळी जनतेला सांगितले आहे. तरीपण जनतेच्या मनामधील शंका दूर होत नव्हत्या , काही जणांनी सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतीत याचिका देखील दाखल केल्या होत्या . त्याची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला याबाबत स्पष्टीकरण मागितले तेव्हा आयोगाने ईव्हीएम हे खात्रीशीर असून त्यात कुठल्याही प्रकारचा बदल फेरफार करता येणे शक्य नाही असे स्पष्ट केले . तसेच मतदारांना आपण दिलेले मत हे आपण दिलेल्या उमेदवाराला गेले आहे याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट या मशीनचा उपयोग आयोगाने चालु केला आहे . या व्हीव्हीपॅटमुळे मतदाराला आपण दिलेल्या उमेदवाराला मत गेले आहे याची खात्री कागदी पावती द्वारे दिली जाते. जेव्हा मतदार हा मतदानासाठी ईव्हीएम चे बटन दाबतो तेव्हा त्याला जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशीन मधून एक कागदी पावती बाहेर पडून मतदाराला सात सेकंदासाठी दिसते . त्या पावतीवर उमेदवाराचा अनुक्रमांक, उमेदवाराचे नाव आणि उमेदवाराचे चिन्ह असते. त्यामुळे मतदाराला आपण दिलेले मतदान हे आपण दिलेल्या उमेदवारालाच गेले आहे याची खात्री पटते. व्हीव्हीपॅटच्या उपयोगामुळे ईव्हीएम मशीन आता शंका मुक्त झाली आहे असे समजण्यास हरकत नाही. तसेच मतदाराला देखील आता त्यांच्या मतदानाबद्दल शंका बाळगण्याचे काही कारण उरलेले नाही.
Leave a Reply