NEET’ case should not cast doubt on Latur pattern – Adv. Pradeep More

नीट’ प्रकरणाने लातूर पॅटर्नवर शंका उपस्थीत करू नये – ॲड. प्रदीप मोरे

Pradeep More

लातूर / प्रतिनिधी : नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणाचे धागे-दोरे लातुरात मिळाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. वास्तविक या प्रकरणामुळे लातूर पॅटर्नवर शंका उपस्थित होत असल्यातरी ज्या पॅटर्नमुळे लातूरचा नाव लैकिक झाला आहे, त्या पॅटर्नला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. प्रत्येक क्षेत्रात काही विकृत प्रवत्ती असतात. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील याच प्रवृत्तीने हे कृत्य केलेले असून त्या प्रवृत्तीला वेळीच ठेचने आवश्यक आहे. या प्रकरणात संबंधितांवर कडक कार्यवाही होईल असा विश्वास व्यक्त करून ॲड. प्रदीप मोरे यांनी या प्रकरणाने लातूर पॅटर्नवर शंका उपस्थित करू नये असे आवाहन केले आहे.

शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण देशभरात नावाजलेला असून या पॅटर्नला नाव लौकिक मिळवून देण्यासाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तज्ज्ञ, प्राध्यापक व शिक्षण संस्थांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. निःस्वार्थ भावना ठेवून शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्या मंडळींमुळे लातूर पॅटर्नचा पाय रचला गेला आहे. यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतलेली असून या मेहनतीला त्या त्या वेळी विद्यार्थ्यासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी योग्य साथ दिलेली आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न घडवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेऊन पाय रचला त्यावर कळस चढविण्याचे काम विद्यार्थ्यांसह या क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेकांनी केलेले आहे. वर्षानुवर्षांचे प्रामाणिक प्रयत्न आणि केलेली अपार मेहनत या मुळेच शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ देशभरात नावाजला गेला. मात्र या पॅटर्नला गालबोट लावण्याचे काम काही स्वार्थी व विकृत मनोवृत्तीने केलेले आहे. असे मत ॲड. प्रदीप मोरे यांनी व्यक्त केले आहे.

प्रत्येक क्षेत्रात स्वार्थी व विकृत मनोवृत्ती असतात असे सांगून शिक्षण क्षेत्रातही या मनोवृत्तीचा शिरकाव झाल्याची खंत ॲड. मोरे यांनी व्यक्त केली आहे. याच मनोवृत्तीने पेपर फुटीचे पाप केले असून या मनोवृत्तीला पाठीशी घालणे कदापी शक्य नाही. मात्र या काही लोकांच्या मनोवृत्ती मुळे  संपूर्ण क्षेत्राला बदनाम करणे योग्य नाही, त्यामुळे ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न व मेहनत घेतली त्यांच्यावरही शंका उपस्थित होऊ लागली आहे. परिणामी लातूर पॅटर्न वर ही संशय निर्माण होऊ लागला आहे. या प्रकरणी गुन्हेगार असणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आपली न्याय व्यवस्था सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त करून या प्रकरणाने लातूर पॅटर्नवर शंका उपस्थित करून नये, असे आवाहन ॲड. प्रदीप मोरे यांनी केले आहे.

Source-https://lcn24.com/neet-case-should-not-cast-doubt-on-latur-pattern-adv-pradeep-more/2325/

Author photo
Publication date:
Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *