राजकीय कार्य:-
- सन 1991 पासून राजकारणात सक्रिय सहभाग
- शहर सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आदीसह पक्षामध्ये विविध जबाबदारी समर्थपणे सांभाळली
- मा. कै. प्रमोदजी महाजन साहेब, मा. कै. गोपीनाथरावजी मुंडे साहेब, कै. सूर्यभानजी वहाडणे साहेब, कै. धरमचंद चोरडिया साहेब, कै. ना. स. फरांदे, कै. शरदभाऊ कुलकर्णी, मा. ना. नितीनजी गडकरी साहेब, मा. ना. विनोदजी तावडे साहेब, मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. रावसाहेब पाटील दानवे साहेब, मा. डॉ. गोपाळरावजी पाटील, मा. श्रीकांतजी जोशी, मा. संजय जी कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल
- सन 1991 च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद/पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आदी निवडणुकीत सक्रिय सहभाग व विविध जबाबदारी पार पाडली
- सन 1993 च्या लातूर जिल्ह्यातील महाप्रलयंकारी भूकंपामध्ये पक्षातर्फे मौजे नांदुर्गा तालुका औसा जिल्हा लातूर हे गाव दत्तक घेण्यात आले होते, यामध्ये पूर्णवेळ सहभाग
- मा. डॉ. गोपाळरावजी पाटील साहेब राज्यसभेचे (मार्च 1994 ते मार्च 2000) खासदार असताना त्यांच्या प्रशासकीय कार्याची जबाबदारी सांभाळली
- युती शासनाच्या काळात सिद्धेश्वर सहकारी बँक म. लातूर येथे प्रशासक म्हणून नियुक्ती. बँक थकबाकीमुळे बंद करण्यासाठी रिझर्व बँकेने नोटीस काढलेली होती. सक्तीने कर्ज वसुली करून, बँकेची उर्जित अवस्था तीन महिन्याच्या कालावधीत आणली. कै. गोपीनाथरावजी मुंडे साहेब व मा. दत्ताजी राणे साहेब यांनी कौतुक केले
- खासदारामार्फत नेमण्यात येणाऱ्या दूरसंचार व पंतप्रधान रोजगार योजना समितीवर काम केले. दरवर्षी सुमारे 200 बेरोजगार तरुणांना कर्ज मिळवून देण्यात पुढाकार. आज त्यांपैकी अनेकजण स्थिर व्यवसायात आहेत.
- रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी मध्ये प्रशिक्षण
- युती शासनाच्या काळात शासकीय रुग्णालय लातूरच्या सल्लागार समितीवर नियुक्ती. शहरातील सर्वात चांगले रुग्णालय म्हणून दरम्यानच्या काळात शासकीय रुग्णालयाचा नावलौकिक केला.
- लातूर तालुका अध्यक्ष (सन 2000 ते 2003 ) असताना लातूर तालुक्यातील 117 पैकी 69 गावांमध्ये भाजपाच्या शाखा स्थापन केल्या. तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नियमित बैठक चालू केली. बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकशाही दिनामध्ये कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य. तालुक्यातील शाखांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून विशेष ओळखपत्राचे वाटप केले. शासकीय कार्यालयात या ओळखपत्राचा चांगलाच उपयोग कार्यकर्त्यांना होत असे. नियमित बैठका होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आपापसातील मतभेद दूर होऊन सर्वचजण एक दिलाने पक्ष कार्य करीत असत. याचाच परिणाम म्हणून लातूर तालुक्यात सत्यवान गोकुळे हा कार्यकर्ता सर्वप्रथम पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आला व पक्षाचे लातूर ग्रामीण मध्ये खाते उघडले. विशेष म्हणजे कै. विलासराव देशमुख हे (ऑक्टोबर 1999) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. दरम्यान अनेक ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून आणण्यात पुढाकार.
- रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग. याचदरम्यान उस्मानाबाद येथील कारागृहात पाच दिवस कोठडी. मा. डॉ. गोपाळरावजी पाटील, जितेश चापसी, तत्कालीन नगरसेवक विलास स्वामी गुरुजी यांच्यासह जवळपास 100 जणांना कारावास.
- पक्षाच्या सर्व उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग.