सामाजिक कार्य:-
- लातूर येथील जवाहर सहकारी सूतगिरणीच्या विक्री व्यवहारात झालेल्या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवला, जो तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या काळातील व त्यांच्याशी संबंधित होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. नारायण राणे साहेब यांनी विधिमंडळात आवाज उठवून शासनाला चौकशी करण्यास भाग पाडले.
- लातूर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री. प्रदीप राठी यांनी शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी लावली व जिल्हाधिकारी, मनपा प्रशासनास कार्यवाही करण्यास भाग पाडले.
- प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना तोंडार, तालुका उदगीर, जिल्हा लातूर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे तारण ठेवलेली 6000 क्विंटल साखर परस्पर विकल्या प्रकरणी तक्रार करून चौकशी करण्यास भाग पाडले.
- सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात नेहमीच प्रयत्नशील राहून अन्यायाच्या विरोधात अग्रेसर. त्याचाच एक भाग म्हणून, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश श्री सुधीर देशमुख यांच्या अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणात 1998 साली उच्च न्यायालय मुंबईकडे तक्रार दाखल केली. चौकशी अंती न्यायमूर्ती देशमुख यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.
- आ. अमित देशमुख यांचे बंधू, सिने अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मेसर्स देश ऍग्रो कंपनीला आ. धीरज देशमुख अध्यक्ष असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमबाह्यपणे 116 कोटी रुपये कर्ज मंजूर केले, यावर आवाज उठवला.
- श्रीशैल्यम (आंध्र प्रदेश) येथे शिवाजी स्फूर्ती केंद्र या ट्रस्टवर संचालक म्हणून कार्यरत. छत्रपती शिवाजी महाराज भव्य दरबार हॉल, पंधरा फुटी सिंहासनाधिष्ठित महाराजांची मूर्ती, ध्यानमंदिर व अद्यावत गेस्ट हाऊस यासारखे उपक्रम ट्रस्टमार्फत चालवले जातात. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या ध्यान मंदिरासाठी 3 कोटी रुपये अनुदान दिले. पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे काका व काकू यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.
- लातूर येथील “मराठा मंडळ” या ट्रस्टवर सचिव म्हणून कार्यरत. या संस्थेत 135 मुलींना माफक दरात राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, ज्याचा लाभ सर्व जाती धर्मातील विद्यार्थिनींना होतो.