आध्यात्मिक कार्य :-
- संपूर्ण जगामध्ये आध्यात्मिक कार्य मोठ्या प्रमाणात राबवणारी सर्वात मोठी धार्मिक चळवळ असलेल्या इस्कॉनमध्ये सक्रिय सहभाग. लातूर येथे सदर चळवळ रुजविण्यात सक्रिय पुढाकार जगन्नाथ रथ यात्रा लातूरमध्ये इस्कॉन तर्फे चालू करण्यात सिंहाचा वाटा. सन 2013 पासून दरवर्षी नियमितपणे आता सुद्धा रथयात्रा होत आहे. दर रविवारी प्रवचन व मोफत अन्नदान करण्यात येते. लातूरमध्ये स्थायी स्वरूपाचे केंद्र चालू करण्यात महत्त्वाची भूमिका .
- श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र :- या संघटनेचा लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य. या माध्यमातून ग्राम स्वच्छता वैद्यकीय शिबिरे, गरजूंना शैक्षणिक व इतर आवश्यक ती मदत, रक्तदान शिबिरे, भजन संध्या आदी कार्यक्रम पुढाकार घेऊन राबविले. या संस्थेचे कार्य हे प्रामुख्याने ग्रामीण भागात चालते. हृदयाच्या आणि मेंदूच्या रुग्णासाठी मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. तसेच सेवा म्हणून भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या “तपोवनम” या पारायण ग्रंथाचा मराठी अनुवाद .
- लातूर शहरातील वैभव नगर येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर , मौजे कासारखेडा ता. लातूर येथील महादेव मंदिर , कातपूर रोड बसवेश्वर चौक लातूर येथील महादेव मंदिर , नंदनवन कॉलनी लातूर येथील महादेव मंदिर ,उभारण्यात सक्रिय सहभाग.