What is the ancient context of Gudipadva?
गुढीपाडव्याच्या प्राचीन संदर्भ काय?
प्रदीप मोरे: आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. आजचा दिवस गुढीपाडवा सण म्हणून आपण साजरा करतो .हिंदू वर्षाची सुरुवात आज पासून होते. आजचा हा गुढीपाडव्याचा सण म्हणजे आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे .आजच्या दिवशी कुठल्याही शुभ कार्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही. मान्यता अशी आहे की ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना देखील आजच्या दिवशी केली होती. अशा या गुढीपाडव्याचा संदर्भ महाभारतात देखील आहे. महाभारताच्या आदी पर्वामध्ये इंद्राने राजा परिचर बसू याला कळकाची काठी दिली आणि राजाने इंद्राने दिलेली काठी मातीमध्ये रोवली आणि तिचे समृद्धीचे प्रतिक म्हणून पूजा करू लागला . तीच परंपरा आज देखील आपण चालवत आहोत . अशा या पवित्र गुढीपाडवा सणाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
Leave a Reply